पंढरपूर/प्रतिनिधी :
मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक पालन करीत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरु केले. यामध्ये १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत शहरात २१५ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत कोरोना बधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. माघीयात्रा यात्रा कालावधीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मठामध्ये नव्याने येणाऱ्या भाविकांना बंदी करण्यात आली आहे. पंढरीत भाविकांची गर्दी वाढू नये यासाठी प्रशासनाकडून मठ, मंगल कार्यालय, ६५ एकर परिसर, नदीपात्र या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात असल्याची माहिती श्री. गुरव यांनी दिली.
यात्रा कालावधीत गर्दी होणार नाही याची दक्षता संबधितांनी घ्यावी तसेच संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोणीही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
0 Comments