पंढरपूर/प्रतिनिधी:
उद्या वसंत पंचमी च्या मुहूर्तावर वैष्णवांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा होणार आहे. या विवाह सोहळ्याची संपूर्ण तयारी आली आहे. या विवाह सोहळ्यात मंदिराच्या सभागृहामध्ये ३६ प्रकारच्या ५ टन फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली तर स्वर्गातील देव उपस्थित राहतात असा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
शाही विवाह सोहळ्यात कोरोनाचे नियमांचे पालन
शाही विवाह सोहळ्याची आयोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती चे नियम पाळत होणार आहे, या विवाह सोहळ्यासाठी मोजक्याच लोकांना समितीकडून परवानगी देण्यात आली आहे, करुणा महामारी मुळे साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यासाठी ५ टन फुलांची सजावट
प्रत्येक वर्षी वसंत पंचमी च्या मुहूर्तावर श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा पार पडत असतो या विवाह सोहळ्यासाठी पुणे येथील भक्त भुजबळ यांनी ३६ प्रकारच्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. संपूर्ण मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवलं जातं. सकाळी विठ्ठल आणि रुख्मिणीला शुभ्र वस्त्रांनी, तर रुख्मिणी मादेला मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकारांनी सजवलं जातं.
विवाह सोहळा अशा पद्धतीने रंगतो
विवाह सोहळ्याची सुरुवात सकाळी अकराच्या सुमारास रुक्मिणी मातेच्या गर्भ ग्रहापासून गुलाल उधळत विठ्ठलाकडे नेला जातो श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची अलंकारांनी सजवलेली उत्सवमूर्ती विवाह सोहळ्यात याठिकाणी आणली जाते. दोन्ही मूर्तींना मुंडावल्या बांधल्या जातात. त्यानंतर अंतरपाठ धरला जातो. विवाह सोहळ्याला उपस्थित लोकांना फुलं आणि अक्षतांचं वाटप होतं. त्यानंतर मंगलाष्टका होतात. मंगलाष्टका संपल्यावर उपस्थितांच्या टाळ्या आणि टाळ-मृदुंगाच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून जातो. अशा प्रकारे श्री विठ्ठल आणि रुख्मिणी मातेचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पाडला जातो.
विठ्ठलाची रंगपंचमी सुरु
वसंत पंचमीपासून ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठलाला पांढरा शुभ्र वेश परिधान केला जातो. या काळात रोज विठ्ठलाच्या अंगावर गुलालाची उधळण होते. वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना विठ्ठलाची रंगपंचमी सुरु राहते. विठ्ठलाच्या या रंगपंचमी उत्सवाची सुरुवात वसंत पंचमीपासूनच होते.
0 Comments