लोकशाहीचं मूळ हिंदू विचारधारेतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस


हिंदू विचारधारा ही भारताच्या लोकशीचा मूलाधार आहे , असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे . ते आज साप्ताहिक विवेक चे माजी संपादक , जेष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांच्या जन्मदिनाच्या अमृतमहोत्सानिमीत्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते . हिंदू विचारांमुळेच देशात लोकशाहीची वाढ झाली असं फडनवीस म्हणाले . सध्या अनेक मार्गांनी देशाची लोकशाही कमकुवत करायचे प्रयत्न होत आहेत , मात्र आपली विचारधाराच यातनं मार्ग दाखवत असते असं ते म्हणाले . 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपलेपणाची भावना ही देश आणि समाजासाठी महत्वाची असते . आपल्या संविधानात स्वतंत्रता , बंधुता आणि समतेचा उल्लेख आहे . हे शब्द विदेशी नसून , भगवान गौतम बुद्धांच्या विचारांच्या प्रेरणेतून लिहीले गेले , असं संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहब आंबेडकर यांनी म्हटलं असल्याची आठवणही भागवत यांनी यावेळी करून दिली .
 

Post a Comment

0 Comments