श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात, विवाह सोहळ्यासाठी एक लाखाचा पोशाख


पंढरपूर/प्रतिनिधी:

राज्याचे आराध्यदैवत असणारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा १६ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी च्या मुहूर्तावर होणार आहे. या विवाह सोहळ्याची धामधूम आता अंतिम टप्प्यात असून. या विवाह सोहळ्यात विठू राया नवरदेव असतो रुक्मिणी माता नवरी चा रूपात असते. या विवाह सोहळ्यासाठी बेंगलोर येथील सविता चौधरी या फॅशन डिझायनर  सिल्क कपड्यापासून तयार केलेल्या पोशाख तयार केला आहे. त्यांची एक लाख रुपये किंमत आहेत.
(Advertise)

विठुराया व मातेच्या विवाह सोहळ्यासाठी सुरेख पोशाख..

वसंत पंचमी च्या मुहूर्तावर श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी केली जाते. त्यात विठुराय हा नवरा देव होतो तर रुक्मिणी माता नवरी असते. या विवाह सोहळयासाठी बंगलोर येथील सविता चौधरी या महिला भाविकाने विठ्ठलसाठी धोती, अंगी, पागोटे, उपरणे तर रुक्मिणीसाठी पांढराशुभ्र पोशाख कांचीपुरम सिल्क साडी व चोळी असा बसता  बांधण्यात येतो. मंगळवारी तो बसता  कार्यकारी अधिकारी जोशी यांच्याकडे चौधरी यांनी सुपूर्त केला आहे. चौधरी यांना हा पोशाख सिल्क कपड्यापासून तयार करण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागला. विठू राया हा विष्णूचा अवतार म्हणून पाहिला जातो त्या प्रमाणातच विष्णू देवाच्या रूपातील शंख चक्र ओम असे चित्र असणारे नक्षीदार कपड्यावर करण्यात आले आहे.

(Advertise)

विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

१६ फेब्रुवारी रोजी पंचमी च्या मुहूर्तावर वैष्णवांचा आराध्य दैवत असणार्‍या विठुराया व रुक्मिणी मातेचा विवाह लावण्यात येत असतो. मंदिरातील सभामंडपाला लग्नाची स्थळ म्हणून फुलांनी सजवण्यात येत असते तसेच लग्नसमारंभात येणाऱ्या भाविकांना अक्षता वाटण्यात येतात. विठ्ठल व रुक्मिणी मातेला सजवलेले उत्सवमूर्ती मध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टिका ही मानल्या जातात. शेवटचा अक्षता पडतात अंतरपाट बाजूला काढून विठुरायाला व मातेला पुष्पहार घालून त्यांची आरती करण्यात येते मात्र यावर्षी करून असल्यामुळे मोजक्याच वऱ्हाडी उपस्थित होणार आहे.

Post a Comment

0 Comments