गेल्या काही दिसांपासून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या वाटाघाटी होत होत्या. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या गळ्यात जर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली तर काँग्रेस त्यांच्या जागी शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद देण्यास तयार आहे. या बदल्यात शिवसेना काँग्रेसला उपमुख्यमंत्री देईल.
सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद आहे. दुसरे उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तर काँग्रेस हे पद शिवसेनेला देण्यास तयार आहे. त्याबदलत्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे तुलनेने महत्त्वाची पदं आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे.
काँग्रेसच्या या प्रस्तावाला शिवसेनेही अनुकूलता दर्शवल्याचे कळते. शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळणार असेल, तर सेनेसाठी ते फायद्याचे आहे. विधानसभा अध्यक्षपद घ्या आणि उपमुख्यमंत्रिपद द्या, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments