परांडा! सिरसावच्या सरपंच पदी कुमार वायकुळे तर उपसरपंच पदी केदार पाटील यांची बिनविरोध निवड


सिरसाव/प्रतिनिधी:

बहुचर्चित असणारी सिरसाव ग्रामपंचायत निवडणूक पार पडली, तरुणांनी पुढाकार घेऊन बंड केला बंडाचे वादळ येवढे मोठे होते की आकरा पैकी तिसऱ्या आघाडीचे ५ तरुण चहरे निवडून आले. विरोधात शिवसेनेचे ३ आणि राष्ट्रवादीचे ३ उमेदवार विजयी झाले.

पण तरुणांनी केलेल्या बंडामुळे गावच्या राजकारणातला चहराच बदलला होता. कोणते समीकरण कोणीकडे जुळत नव्हते,  शेवटी शिवसेना ३ व राष्ट्रवादी ३ असे समीकरण जुळवून शिवसेनेचा सरपंच व राष्ट्रवादी चा उपसरपंच झाला.

(Advertise)

महाविकास आघाडी तयार करुन शिवसेना व राष्ट्रवादी सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यामध्ये शिवसेनेचे अवघ्या २५ वर्षाचे उमेदवार कुमार पांडुरंग वायकुळे यांची सरपंच पदी निवड तर केदार दत्तात्रय पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी मेघराज गायकवाड यांनी कामकाज पाहिले.





Post a Comment

0 Comments