प्रवासात आजपासून ‘ही’ गोष्ट अनिवार्य, अन्यथा भरावी लागेल दुप्पट रक्कम!



राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानूसार रविवारी(ता.१४) मध्यरात्रीपासून सर्व टोल प्लाझावर कॅश लेन बंद करण्यात येणार आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून याआधीच Fastag अनिवार्य करण्यात आला होता, मात्र १४ तारखेपर्यंत फास्टटॅगविनाही वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करता येत होता.

याआधी १ जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्गांवर कॅश लेन बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला होता. आता सर्वांना फास्टॅग बंधनकारक असून ज्याच्याकडे फास्टॅगग नसेल त्याला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

फास्टॅगसाठी आता कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं नुकतंच नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आजपासून यासंदर्भात कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. टोल नाक्यांवर वाद टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. दरम्यान, देशातील २३ बँकांच्या माध्यमातून फास्टॅगची विक्रीसुविधा सुरु आहे. 

Post a Comment

0 Comments