विरकरवाडीच्या सचिनला क्रीडा राज्यमंत्री तटकरे यांनी दिल्या शुभेच्छा



मुंबई  : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मौजे विरकरवाडी येथील उदयोन्मुख क्रिकेटीयर सचिन अशोक झिमल यांला क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सध्या चिंचवडच्या ॲम्बीशिअस क्रिकेट क्लबमधून खेळणाऱ्या सचिनची नुकतीच आयपीएल संघासाठी रॉयल चॅलेंज प्लेबोल्ड या इव्हेंटसाठी ऑन ग्राऊंड ट्रायलसाठी निवड झालेली आहे. जिल्हा पातळीवर गोलंदाजी व फलंदाजी अशी दुहेरी कामगिरी उत्तम बजाविणाऱ्या सचिनची रणजी स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे. यापूर्वी सचिनने विजय हजारे करंडक व सईद मुस्ताक अली करंडक यामधून उत्तम कामगिरी बजाविलेली आहे.

क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी सचिन झिमल यांचे क्रिकेटमधल्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments