संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ


टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांचं नाव भाजपने घेतल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. विरोधीपक्षाकडून संजय राठोड यांच्यावरती कारवाईची मागणी होत आहे. अश्यातच, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कसली वाट बघतायेत, त्यांच्या मुसक्या आवळा, असं म्हणत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलीय.

(Advertise)

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत ११ ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलीसांनी दिली आहे ना, पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजतं. हे संपूर्ण प्रकरण आता तापत चाललं असून, पुणे पोलीसांनी सविस्तर खुलासा करण्याची मागणीही सोशल मीडियात होत आहे.

(Advertise)

पूजाने रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. पुण्यातील वानवडी येथे इमारतीवरून उडी घेऊन तिने आत्महत्या केली होती. तिच्या डोक्याला आणि मनक्याला गंभीर दुखापत झाल्याचंही सांगितलं जात आहे. 

Post a Comment

0 Comments