रहेनुमा चॕरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने या कारणांसाठी करमाळा नगरपालिकेला देण्यात आले निवेदन.

करमाळा/प्रतिनिधी:
           
करमाळा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम बांधवांसाठी आनंदबाग कब्रस्तान (दफनभुमी) येथे नगरपालिकेने बोअरवेल घेऊन, त्यावर हातपंप बसविला आहे. परंतु सध्या तो नादुरुस्त असल्यामुळे, बोअरवेलला पाणी असुनसुध्दा मयताच्या अंत्यविधी प्रसंगी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे गैरसोय होत आहे. तरी सदर बोअरवेलवरील नादुरुस्त हातपंप काढुन बोअरवेलवर ईलेक्ट्रीक मोटार बसवून, पाण्याअभावी होणारी गैरसोय टाळावी. व या परिसरामध्ये आम्ही वृक्ष लागवड करणार आहोत. सदर वृक्षांना पाणी देणे सोयीचे होईल. आपल्या नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत  सदरचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसेल हीच अपेक्षा.
      (Advertise)

या दफनभुमीमध्ये रात्री-अपरात्री मयत झाली तर, दफनभुमीमध्ये दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे अंत्यविधी करताना साप, विंचू इ. विषारी प्राण्यांचा दंश होण्याची भीती असते. तसेच अंधारामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या रहेनुमा चॕरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेमार्फत दफनभुमीमधील काटेरी झुडपे काढणे, परिसर स्वच्छता, अंतर्गत रस्ते, वृक्ष लागवड इत्यादी कामे केली जात आहेत.
        (Advertise)

तरी आपणांस विनंती आहे की, वरील दोन्ही विषयांचे गांभीर्य ओळखून, त्यांचे निवारण कराल ही अपेक्षा. सदर सोयी-सुविधांची देखभाल करण्यास रहेनुमा चॕरिटेबल सोशल वेल्फेअर संस्था सक्षम आहे. असे निवेदन करमाळा नगरपालिकेला देण्यात आले आहे. तरी हे निवेदन देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष-हाजी कलीम काझी सर, सचिव- सुरज शेख, मार्गदर्शक- इसाक पठाण, राष्ट्रवादी करमाळा शहर उपाध्यक्ष- आझाद शेख, संस्थेचे उपाध्यक्ष- ईमत्याज पठाण, मुस्तकिम पठाण, सहसचिव राजू सय्यद, जमील बागवान, शमो सय्यद इ. पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments