करीना - सैफ पुन्हा झाले आई- बाबा ; करिनाला पुत्रप्राप्ती


 बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि सैफअली खान यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. लॉकडाऊनमध्ये करिना कपूर हिच्या प्रेग्नेसींबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या. करिना कपूर हिला काल रात्री मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज २१ फेब्रुवारी रोजी करिनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

करिना कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करिनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. दरम्यानच्या काळात तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता. प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती.

 दरम्यान नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी कपूर कुटुंबीय सज्ज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबीय व मित्रमंडळींकडून करिनाने शुभेच्छा पत्र व भेटवस्तू येत होत्या. करिना आणि सैफ पुन्हा एकदा आई-बाबा झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments