प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
'आता नावासाठी नाही; तर फक्त गावासाठी' या ब्रिद वाक्य डोळ्यासमोर ठेवून कामाची सुरुवात करणारे व आम्ही जांभळीकर या टॅग खाली सदैव वनराईच्या अतूट ध्येयाने प्रेरित झालेले आहेत. या गावातील लहान बालकापासून वृद्धापर्यंत व कुटुंबाचा संसार सांभाळणाऱ्या माता-भगिनी सातत्याने गावाच्या भल्यासाठी, समाजाच्या आनंदासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी कोणत्याही पद्धतीने काम करीत असतात.
त्यापैकी वनराईच्या दातृत्वासाठी व मित्र प्रेमापोटी 'श्रीदत्त कॉर्नर युवक मंडळाचे' सदस्य कालवश राजेंद्र स्वामी यांच्या प्रथम वर्षश्रद्धा निमित्त मंडळाच्यावतीने ५१ रोपांची ऑक्सीजन पार्कला अनोखी भेट देऊन समाजासमोर एक आदर्शता व संवेदनशीलता समोर ठेवली आहे. हे कार्य पूर्णतः गावासाठी व मित्रा करिता आहे. परंतु मंडळातील सर्व सदस्यांची इच्छा होती कोणत्याही प्रकारे याचा गाजा वाजा होता कामा नये व या अनोख्या भेटीने मित्राचा प्रथम स्मृतिदिन ही आठवणीत राहावा ही अपेक्षा होती.
खरंच जांभळी गावातील प्रत्येक व्यक्ती हा वृक्ष प्रेमाने प्रेरित झालेली आहे हे यातून लक्षात येते. तसेच कालवश राजेंद्र स्वामी हे देखील मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने कार्य करीत होते त्यांचं कार्य हे प्रेरणादायी व समाजाभिमुख होते त्यांच्या अचानक जाण्याने जांभळीकर व त्यांच्या मंडळाला खूप मोठा धक्का बसला असून त्यांची पोकळी कधीही भरून न निघणारे आहे. परंतु या जांभळी मंडळाचे प्रेम त्यांच्या या आठवणीला कोणत्याही पद्धतीने उजाळा देत राहणार हे अगदी उघड सत्य आहे. त्यांच्या व्यक्तिमत्व व कार्यपद्धतीला सलाम करण्यासाठी हे वनराई बांधिलकीचे अनोखे प्रेम आहे. या मंडळातील सर्व सदस्यांचे व गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments