मुंबईतील खार परिसरात हायप्रोफाईल सोसायटीत एका मुलीची हत्या करण्यात आली आहे. खार परिसरात भगवती हाईट्स नावाची इमारत आहे. या इमारतीच्या गच्चीवर काल नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत इमारतीतील काही रहिवाशी, तसेच त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक सहभागी झाले होते. या पार्टीत अनेकांनी दारु प्यायली होती.
पार्टी सुरु झाल्यानंतर ती मृत मुलगी गच्चीवर पोहोचली. त्यावेळी त्या ठिकाणी एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत तिथे बसले होते. त्या मृत मुलीने त्या जोडप्याला हटकत त्यांच्यावर आक्षेप घेतला. यावरुन या जोडप्याचा आणि त्या मुलीचा वाद सुरु झाला. वाद अगदी विकोपाला पोहोचला. त्या जोडप्याने त्या मुलीला जबर मारहाण केली. या मारहाणीदरम्यान तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
0 Comments