आदिनाथ साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकित पगारी अदा केल्याशिवाय कारखाना सुरु करु देणार नाही -दशरथ (आण्णा) कांबळे


करमाळा/प्रतिनिधी:

आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्याच्या हालचालीनी जोर धरलेला आहे. परंतु हा कारखाना कोण चालविण्यासाठी घेणार. आणि जो कोणी व्यक्ती कारखाना चालविण्यासाठी घेणार. तो व्यक्ती कामगारांच्या थकित पगारी देणार? का फक्त आश्वासन देणार? किती कामगारांना कामावर ठेवणार? अन्यथा, आहे त्याच कामगारांची कपात करणार? या सर्व बाबींची समिक्षा करण्यासाठी व कामगारांची काय भुमिका असली पाहिजे. या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी सर्व कामगारांनी आदिनाथ सहकारी कारखान्याच्या आवारात समिक्षा बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन करण्यासाठी, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष, दशरथ (आण्णा) कांबळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळेस सर्व कामगारांनी यापुढील आदिनाथ कारखान्याचा लढा दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वात लढण्याचे एकमुखाने ठरविले आहे.

दशरथ कांबळे यांनी कामगारांना संबोधित करताना सांगितले की, आज तुमच्या चेहऱ्यावर हसुसुध्दा तुम्हाला नकली आणावे लागत आहे. तालुक्यामध्ये खुप सारे कामगारांचे, शेतकऱ्यांचे नेते फिरत आहेत. परंतु या किती लोकांनी तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी तुमची भेट घेतली आहे.

Post a Comment

0 Comments