प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे, कॉलेजमध्ये दर्पणकार अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र विवेक वाहिनी या विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी हुपरी आणि हुपरी परिसरातील मान्यवर पत्रकार श्री. बाळासाहेब चोपडे,संजय पाटील,उत्तम पाटील, वसंत पाटील, दीपक तोडकर, हुमायुन नदाफ, मुबारक शेख, अल्लाउद्दीन मुल्ला,राजेंद्र पुजारी, सचिन कुंभार, सचिन उगले, अमोल सवाईराम, प्रवीण कुंभोजकर,धनंजय खाडे,शहानवाज मोमीन आदी पत्रकार बंधू उपस्थित होते.कॉलेजच्या प्राचार्य, डॉ.श्रीमती पी.बी.पाटील यांनी या सर्वांना पुष्पगुच्छ व लेखणी प्रधान करून सन्मानित केले.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.सौ.संध्या माने यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी सन्मानित पत्रकार दीपक तोडकर यांनी पत्रकारांच्या लेखनीमध्ये प्रचंड सर्व पातळीवर परिवर्तन करण्याची ताकद असून अन्यायास वाचा फोडण्याचे काम हे पत्रकार सातत्याने व निर्भिडपणे करीत असतात. त्याचबरोबर त्यांनी मराठी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव उल्लेख केला. यावेळेस बाळासाहेब चोपडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही कार्याचा उल्लेख करून सर्वांना पत्रकार दिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य,डॉ.श्रीमती पी.बी.पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रत्येक घटकाने चांगल्या विचारांचा स्वीकार करून; वाईट विचारांचा त्याग करावा अशा प्रकारचा उत्तम व व्यवहारवादी संदेश त्यांनी दिला.
सदर कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार उपप्राचार्य, प्रा.डॉ. डी.आर.भोसले यांनी मानले व कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सौ. संध्या माने यांनी केले. या कार्यक्रमा च्या आयोजनासाठी महाराष्ट्र विवेक वाहिनी विभागातील सर्व सदस्य प्राध्यापक प्रा.डॉ. एस.सी.खोले,प्रा.डॉ. एस.जे.आवळे, इतर प्राध्यापक वर्ग व सभासद विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, प्रशासकीय सेवक, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments