आमदार आपल्या दारी अभियान प्रभावीपणे राबवणार- आमदार राजेंद्र राऊत



बार्शी/प्रतिनिधी:

 नववर्षाच्या प्रथम दिवशी काल दिनांक १ जानेवारी २०२० रोजी बार्शी नगरपरिषदेमध्ये, बार्शी शहरांमध्ये सुरू असलेली विविध विकास कामे व रखडलेली, प्रलंबित विकासकामे याबाबतची माहिती घेण्यासाठी नगर परिषदेचे सर्व खातेप्रमुख, नगरसेवक, इंजिनिअर व प्रमुख ठेकेदार यांची संयुक्त आढावा बैठक घेतली.
             
या बैठकीत विकास कामांना गती देवून ती कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सुचना दिल्या. तसेच बार्शीकर नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, मी स्वतः बार्शी शहरात आमदार आपल्या दारी अभियान राबविणार आहे.
          (Advertise)    

बैठकीस नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी सौ.अमिता दगडे पाटील मॅडम, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक प्रशांत कथले, बापूसाहेब वाणी बाळासाहेब लांडे, भारत पवार सर, पक्षनेते विजय नाना राऊत, गटनेते दिपक राऊत, विजय चव्हाण, बापूसाहेब जाधव, ॲड‌. महेश जगताप, कय्युम पटेल, भैय्या बारंगुळे, अमोल चव्हाण, पाचू उघडे, काकासाहेब फुरडे, रितेश वाघमारे, मदन गव्हाणे, गणेश चव्हाण व सर्व  नगरसेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments