सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समित्या शनिवार आणि रविवारी राहणार सुरु


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामांना आधी चांगल्या पद्धतीने गती/वेग देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी पुढाकार घेतला आहे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या शनिवारी दि ०२/०१/२०२१ आणि दि ०३/०१/२०२१ रोजी सुरु ठेवण्याचे आदेश संबंधित गटविकास अधिकारी यांना दिले आहेत .

या योजनेचे नियोजन करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी सर्व पंचायत समित्या सुरु ठेवण्यात येणार आहेत प्रत्येक तालुक्यातील  गटविकास अधिकारी , गटशिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी , बांधकाम मी, लघुपाटबंधारे आणि ग्रामीण पाणी पुरवठा चे अभियंते यांना दोन्ही दिवशी आपल्याशी संबंधित अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत .

सर्व यंत्रणा दोन्ही दिवशी सामान्य करून यांची कामे जिल्ह्यात सुरु करून या योजनेची कामे जिल्ह्यात सुरु करण्यासाठी योग्य  ते नियोजन करावे .याच अहवाल सोमवारी दुपारी १२ पर्यंत सादर करावा अशी सुचना हि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप  स्वामी यांनी दिल्या आहेत .

Post a Comment

0 Comments