सामाजिक न्यायमंञी धनंजय मुंडे यांच्यावर एका तरूणीने बलत्काराचा आरोप केला आहे. त्यानंतर मुंडे यांनी फेसबुकवर सदर तरूणीच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच पेटले आहे. या प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे.
आज नाशिकमध्ये जेष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. फडणवीस पुढे म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची संपूर्ण माहिती दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करावा. त्यातील जी कायदेशीर बाब आहे, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या संदरंभातील सत्य बाहेर आणावे पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आले की, आम्ही आमची मागणी करू," असे फडणवीस म्हणाले आहे.
औरंगाबादचे नामांतर हे तर डुप्लिकेट काम : फडणवीस यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचे संभाजीनगर केलयं.खरे तर त्यांच्याकडे अधिकार आहे. ते अधिकार पदावर आहेत. त्यांनी ट्विटरवर असे काही टाकण्यापेक्षा प्रस्ताव मंजूर करून निर्णय घ्यावा. हे म्हणजे डूप्लिकेट काम झाले आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस-शिवसेनेची मिलीजुली कुस्ती सुरू आहे, अशी टीका फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
0 Comments