माढा/प्रतिनिधी:
सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या विशेष पथकाने म्हैसगाव-शिराळा येथील बंधाऱ्यातून अवैधरित्या वाळू चोरी करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये दोन ब्रास वाळूसह तीन ट्रॅक्टर, एक टेम्पो जप्त करण्यात आली आहे. शिवाय आठ जणांना गुन्हा दाखल करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील विशेष पथकातील पोलीस निरीक्षक विनय बहिरे, कॉन्स्टेबल मनोज राठोड कल्याण भोईटे सतीश एकगुटे यांच्या पथकाने महेश गाव शिराळा बंधाऱ्यामध्ये छापा मारला तीन ट्रॅक्टर एक टेम्पो आढळून आल दोन ब्रास वाळू सह अंदाजे एकूण एकवीस लाख एक्क्वन हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.कारवाईदरम्यान आठ जणांपैकी चार जण पळून गेले तर चार जणांना अटक करण्यात आली.
या कारवाईमध्ये सागर बोरकर (वय २०), संतोष बोरकर (वय ३४), दिपक जगताप (वय ३२) , योगेश गिरी (वय ३०), बंडू सरवदे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून. त्यांचे 4 साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. आठ जणांविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास हवालदार बाबासाहेब घाडगे करत आहेत.
0 Comments