डोनाल्ड ट्रम्प यांची ‘टिवटिव’ ट्विटरने केली कायमची बंद


नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर दोन दिवसांपूर्वी औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला. संसदेत शिरत ट्रम्प समर्थकांनी प्रचंड हिंसाचार घडवून आणला

म्हणून बंद केले ट्विटर अकाऊंट

ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेला घेराव घालत प्रचंड गोंधळ घातला.  ट्रम्प यांचे काही ट्विट्स या घटनेनंतर ट्विटरने डिलीट केले होते. त्याचबरोबर तात्पुरत्या स्वरूपात अकाऊंटही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ट्विटरने अमेरिकेत हिंसाचाराच्या झालेल्या उद्रेकानंतर आणि भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती व्यक्त करत ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे.

Post a Comment

0 Comments