पंढरपूर/प्रतिनिधी:
विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन पासची सक्ती प्रशासनाने केली होती. आता या पासवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने पासची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विठ्ठल भक्तांना पास न घेता विठ्ठलाचे दर्शन करता येणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचे आठ हजार भाविकांना मुखदर्शन घेतले.
कोरूना माऱ्यामुळे १७ मार्च पासून राज्यातील इतर मंदिराप्रमाणे पांडुरंगाचे मंदिरही नऊ महिने बंद ठेवण्यात आले होते. दिवाळी पाडव्यापासून कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑनलाईन पासद्वारे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शनाची सोय मंदिर समितीकडून करण्यात आली होती. आधी मुखदर्शनाची तीन हजार करण्यात आली होती. त्यानंतर ती पाच हजार करण्यासाठी करण्यात आली. मात्र उद्यापासून दररोज आठ हजार भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
पाडव्याच्या मुहूर्त पासून विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आली, मात्र ऑनलाईन बुकींग तेव्हा काही भाविकांना दर्शन घेऊ शकत होते. त्यामुळे राज्यातून येणाऱ्या असंख्य भाविकांना विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेता येत नव्हते. ते भाविक नामदेव पायरी व कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत होते. मात्र आज झालेल्या मंदिर समिती बैठकीमध्ये ऑनलाईन बुकिंग करूनही मंदिर भाविकांविना रिकामे राहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ऑनलाईन पासची गरज नसल्याचा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आला आहे. आता भाविकांना ओळखपत्र दाखवून मुखदर्शन घेता येणार आहे. दरम्यान, ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि १० वर्षांखालील लहान मुलांना मंदिरातील प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
देशभरातील विठ्ठल- रुक्मिणी भक्तांना नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मंदिर समितीने आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या ऑनलान पासची सक्ती रद्द करण्यात आली असून, पासविनाही आता विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये विनापास दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली. बैठकीला समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जवळगावकर, संभाजी शिंदे, साधना भोसले, शकुंतला नडगिरे, श्री. जवंजाळ महाराज, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
0 Comments