धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा…; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना इशारा


राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेनं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेनं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली असून, धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावरून भाजपा आक्रमक होताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments