मंगळवेढा! माचणूर येथील शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या



मंगळवेढा/प्रतिनिधी : 

तालुक्यातील माचणूर येथील सोपान्ना व्हन्नाप्पा गायकवाड ( वय ७०) या शेतकर्‍याने अज्ञात कारणावरून शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

या घटनेची नोंद पोलिसात केली आहे. अधिक माहिती अशी की, यातील मयत सोपान्ना गायकवाड यांनी अज्ञात कारणावरून दि. ७ रोजीच्या पहाटे ५.३० पुर्वी शेतात रहात असलेल्या बांधावरील एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

याची खबर राहुल नांदे यानी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलिस नाईक शंकर चव्हाण हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments