ब्रेकिंग! संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा



देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु झालं आहे. देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. 

 कालच सीरमच्या लसीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आज हि मोठी आणि आनंदाची बातमी मोदी सरकारकडून मिळत आहे.

(Advertise)

 दिल्लीमध्ये पत्रकारांनी त्यांना देशातील सर्व राज्यात कोरोना लस मोफत देणार का? असा प्रश्न केला. तेव्हा, डॉ हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लस दिल्लीतच नाही तर सर्व देशात मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी कुठलंही शुल्क घेतलं जाणार नाही.

 राज्यातील नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये हे ड्राय रन सुरु झालं आहे. या चारही जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्कर्संना पहिल्यांदा कोरोनाची लस दिली गेली आहे.

Post a Comment

0 Comments