हुलजंती ग्रामपंचायतीसाठी ८० % मतदानमतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद; पोलिसांच्या बंदोबस्तात मतदान शांततेत पार



मंगळवेढा/प्रतिनिधी : 

येथील हुलजंती ग्रामपंचायतीसाठी ८० % मतदान झाले. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात शांततेत मतदान पार पडले.  या ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ अगोदरच बिनविरोध झाल्याने फक्त १,२,४ व ५ या प्रभागाच्या एकूण ३७०४ मतदारापैकी २९५४ मतदारांनी मतदान केले. यावेळी जिहाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथील मतदान केंद्राला भेट देऊन संपुर्ण मतदान केंद्राची पाहणी केली.

यावेळी मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. प्रत्येक उमेदवार आपापले मतदार जास्तीत जास्त मतदान कसे करतील यासाठी धडपडताना दिसत होते.  सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मदान करण्यात आले. अशाप्रकारे सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंदिस्त झाले आहे. सोमवार दि. १८ जानेवारी रोजी मंगळवेढा येथील गोडवान येथे मतमोजणी होणार आहे. तरी सर्व उमेदवार व मतदारांना यादीवसाची आत्ता उत्सुकता लागली आहे.संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामपंचयत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments