OLX वर चक्क विकायला काढले नरेंद्र मोदी यांचे संसदीय कार्यालय ; चार जणांना अटक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या गुरुधाम कॉलनीतील कार्यालय काही खोडसाळ व्यक्तींनी ऑनलाइन खरेदी विक्री साइट OLX वर विक्रीसाठी ठेवले.  

 ही जाहिरात OLX वर लक्ष्मीकांत ओझा नावाच्या वापरकर्त्याच्या आयडीवरून शेअर करण्यात आली होती. ही जाहिरात OLX वरून त्वरीत काढून टाकण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  या घटनेनंतर प्रकरणाची चौकशी सुरु झाली असून याप्रकरणी पोलिसांनी ४ व्यक्तींना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

(Advertise)

अशी केली होती जाहिरात

 घराचा प्रकार- घरे आणि व्हिला, बाथरूमसह चार बेडरूम, पूर्ण फर्निचरसह सुसज्ज घर, इमारत क्षेत्र ६५०० चौरस फूट, दोन मजली इमारतीमध्ये दोन कार पार्किंग विक्रीला असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. जाहिरातीमध्ये कार्यालयाची किंमत साडेसात कोटी नमूद केली होती.


Post a Comment

0 Comments