केंद्र सरकारने चीनला जशास तसे उत्तर दिले आहे. चिनी प्रवाशांना भारतात आणू नये, असे अनौपचारिक निर्देश केंद्राकडून सर्व विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.
विमानसेवा बंद तरीही आशा पद्धतीने येतात भारतात
भारत व चीनमधील विमानसेवा सध्या बंद करण्यात आलेली आहे. मात्र परदेशी प्रवाशांच्या प्रवासाच्या सद्यस्थितीतील नियमानुसार, चिनी प्रवासी सर्वप्रथम एखाद्या तिसऱ्या ठिकाणी जात असत, जिथं भारताचे ‘ट्रॅव्हल बबल’ आहे, तिथून ते भारताकडे प्रवास करत.
याशिवाय चिनी ‘एअर बबल’ असलेल्या देशांमध्ये राहत असलेले, चिनी नागरिक देखील कामाच्या निमित्त तिथून भारतात येत होते. उद्योग जगतामधील सुत्रांचे म्हणणे आहे की, भारतात प्रवास करणारे बहुतांश चिनी नागरिक यूरोपच्या ‘एअर बबल’ असलेल्या देशांमधून येतात.
0 Comments