ऑल इंडिया धनगर समाज विद्यार्थी महासंघाच्या पुणे विभागीय कार्याध्यक्ष पदी मंगेश हजारे यांची निवड

धनगर समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी आवाज उठविणाऱ्या आणि धनगर समाजातील लोकांना न्याय देणाऱ्या ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या अखत्यारीत असणाऱ्या ऑल इंडिया धनगर समाज विद्यार्थी महासंघाच्या पुणे विभागीय कार्याध्यक्ष पदी कोल्हापूरचे श्री मंगेश हजारे यांची नुकतीच निवड करण्यात आली. यासंबंधी पुणे विभागीय अध्यक्ष सिद्धनाथ निशानदार यांच्याकडून तसे निवडीचे पत्र नुकतेच प्रसिद्धीस देण्यात आले.
गेले अनेक वर्षे मंगेश हजारे विद्यार्थी दशेत असल्यापासून विद्यार्थी चळवळीत कार्यरत आहेत. यासोबतच धनगर समाजाच्या अनेक मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी शासन दरबारी आवाज उठवलेला आहे.
(Advertise)

"आजपर्यंत याच निस्वार्थीपणे केलेल्या कार्याची ही पोहोचपावती आहे. आणि समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजातील लोकांना, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन", असे श्री मंगेश हजारे यांनी या निवडीबद्दल बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments