विस्फोटक फलंदाज हार्दिक पांड्या पुढील ग्लोबल क्रिकेटर झाल्याचं चित्र आहे. विराट कोहली आणि धोनीच्या फलंदाजांनी अनेकांना वेड लावलं आहे.
आता हार्दिक पांड्याची स्फोटक फलंदाजी पाहून अनेकांना त्याचे हेवा वाटत आहे. इंग्लंडची महिला क्रिकेटपटूही हार्दिक पांड्याच्या फलंदाजी फॅन झाली आहे. त्याच्या विस्फोटक खेळीवर ती फिदा झाली आहे.
इंग्लंडची महिला क्रिकेटपटू एलेक्सेंड्रा हार्टली हार्दिकच्या तुफानी फलंदाजी पाहून हैराण झाली. पंड्याच्या धमाकेदार फलंदाजीवर हार्टलीला विश्वास बसला नाही. तिने ट्विटकरून हार्दिकचे कौतुक केले आहे. हार्दिक पंड्या तू खरच हे करून दाखवले आहेस? या ट्विटसोबत तिने काही इमोजी वापरले आहेत. हार्दिकच्या फलंदाजीचा प्रत्येक जण चाहता झाला आहे.
0 Comments