पंढरपूर मधून पार्थ की भगीरथ त्यांच्या उमेदवारीवरून चर्चेला उधाण, राष्ट्रवादीकडून खंडन


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली मृत्यूनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर पंढरपूर येथे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके  यांच्या नावाचा आग्रह स्थानिक पातळीवर होताना दिसत आहे.. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघांमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांनी बाहेरील उमेदवाराला विरोध दर्शवला आहे.

पार्थ कि भगीरथ भालके...
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी २०१९ साली झालेल्या मावळ मतदारसंघांमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. पार्थ यांच्या बाजूने पवार करण्याची मोठी राजकीय ताकद आहे. २०१९ चा पराभवानंतर पार्थ पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये कुठेही सक्रिय असताना कुठे सक्रिय असताना दिसले नाहीत. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभामधून राष्ट्रवादी काँग्रेस आमदारकी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र  पातळीवर पार्थ पवार यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसत आहे. राजकीय जाणकारांकडून पण पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत अफवा असल्याची बोलले जात आहे.

 भगीरथ भालके हे भारत नाना भालके यांच्या सुपुत्र म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये परिचित आहेत. भगीरथ भालके यांना राजकीय जनसंपर्क थोड्या प्रमाणात आहे. मात्र भारत नाना भालके यांच्या अकाली निधनामुळे भालके कुटुंबाविषयी मतदारसंघांमध्ये सहानुभूतीची लाट आहे. याचा फायदा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. विठ्ठल सहकारी कारखान्याच्या माध्यमातून भगीरथ भालके यांनीही उमेदवारीसाठी आपली दावेदारी दाखवली आहे.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बाहेरील उमेदवार इतिहास

२००९ सालच्या आधी पंढरपूर मंगळवेढा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता सुधाकरपंत परिचारक यांच्या रूपाने पंचवीस वर्ष आमदारकी भूषविली होती सुधाकरपंत परिचारक हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून दहा वर्षे आमदार म्हणून काम केले. मात्र २००९ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला होता तो पेठ सोडवण्यासाठी मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीकडून पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती मात्र स्थानिक पातळीवर  मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीला  प्रचंड विरोध झाला होता. त्यावेळी पंढरपूर येथील स्थानिक नेते भारत नाना भालके यांनी भूमिपुत्र या मुद्द्याच्या बळावर निवडणूक लढवून मोहिते-पाटील यांचा तरुण पराभव केला होता. हा पराभव मोहिते-पाटील यांच्या जिव्हारी लागणारा ठरला.

राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे खंडन..
पंढरपूरचे माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजीत सिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून राष्ट्रवादी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांनी व नागरिकांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला पूर्णतः विरोध दर्शवला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी या उमेदवारी चे पूर्ण खंडन केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून देण्यात आली.

Post a Comment

0 Comments