प्रा. समाधान जाधव/मंगळवेढा:
मंगळवेढा तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मरवडे ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी आज शेवटच्या दिवशी तब्बल ३७ अर्ज दाखल झाल्याने उमेदवारांची एकूण संख्या ७४ वर पोहचली आहे . त्यामुळे निवडणूक लढतीविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सत्ताधारी छत्रपती परिवार पुरस्कृत स्वाभिमानी ग्रामविकास पॕनलने सर्व पाच प्रभागांतून १३ जागांसाठी सुरुवातीलाच एकूण २५ अर्ज दाखल करुन नियोजनात आघाडी घेतली आहे.
दुसरीकडे सत्ताधारी गटाला आव्हान देण्यासाठी सर्वपक्षीय गाव आघाडी स्थापन करण्याचा नेटाने प्रयत्न सुरु होता. जागावाटपाच्या फाॕर्म्युल्याची देखील वारंवार चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत होती. मात्र गाव आघाडीमध्ये अंतर्भूत असलेल्या प्रमुख तिन्ही गटांनी स्वतंत्र आस्तित्व सिद्ध करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात परस्परांवर कुरघोड्या करुन शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले.
________________________________________
श्री हालमत सांप्रदाय मंडळाची २०२१ ची दिनदर्शिका माफक दरात उपलब्ध.....
किंमत फक्त ३० रुपये
संपर्क : ७३८७७१२५२५/९७३००३२७२४
(Advertise)
_________________________________________
त्यामुळे सर्व प्रभागात दुरंगी लढती होणार की काही प्रभागात मैत्रीपूर्ण बहुरंगी लढती होणार याचा अंतिम फैसला ४ जानेवारी रोजी होणार आहे. कालपासून सुरु असलेल्या वेगवान घडामोडीमुळे धन्यकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील युवा आघाडी , लतिफभाई तांबोळी गट , तिसरी आघाडी व धनश्री परिवार या सर्वांचा समन्वय ठेवण्याची मोठी कसरत गाव आघाडीचे अध्यक्ष दत्तात्रय गणपाटील , उपाध्यक्ष संदीप सुर्यवंशी ( हराळे ) यांच्यापुढे आहे .
स्वाभिमानी ग्रामविकास पॕनलचे गटनेते संजय पवार यांनी प्रशासकीय पातळीवरील आपल्या दांडग्या अनुभवाचा उपयोग करीत शिस्तबद्ध पद्धतीने व्युहरचना आखून अपेक्षित निवडणूक निशाणी मिळविण्यासाठी अग्रक्रमाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकंदरीत या सर्व घडामोडीमुळे बिनविरोध निवडणूकीची शक्यता मावळली आहे.
0 Comments