विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर कला विषय महत्त्वपूर्वी : औदुंबर उकिरडे



बार्शी/प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग या पदावर नियुक्ती झालेले औदुंबर उकिरडे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी उकिरडे यांनी कला विषयाचे महत्व अधोरेखित करीत असताना कला विषय शिक्षण प्रक्रियेत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन केले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर इतर विषयाच्या बरोबरीने कला विषयाला पाहायला हवे. कलेचे अनेक उपविषय असून त्या विषयांना वातावरण देणे आवश्यक असल्याचे मत उकिरडे यांनी व्यक्त केले यावेळी कलाशिक्षक महासंघाचे कोल्हापूर विभागीय कार्याध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी कलाशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले राज्य सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली वाटचाल विषद करत  विज्ञान प्रदर्शनासारखे शासन स्तरावरून प्रत्येक तालुक्यात चित्रप्रदर्शन भरविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने उकिरडे यांना अभिनंदन पत्र ही देण्यात आले.यावेळी बार्शी नगर पालिका शिक्षण प्रशासन अधिकारी तथा जिल्हा शिक्षण उपनिरीक्षक अनिल बनसोडे ,कलाशिक्षक महासंघाचे जिल्हा सचिव सावता घाडगे,बार्शी तालुका अध्यक्ष हरिदास कुंभार,मोहोळ तालुका कार्याध्यक्ष नागेश गजभार, कलाशिक्षक उमाकांत बुगडे, मोंहमद बागवान,नितीन मोहिते आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments