"भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचाही विश्वास" -पंतप्रधान मोदी


भारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.‘एएसएसओसीएचएएम’ (ASSOCHAM) संमेलनात ते बोलत होते. तसेच, करोना काळातही भारतात विक्रमी परदेशी थेट गुंतवणूक झाली असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

(Advertise)

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या सामर्थ्याच्या बळावर व संसधानांवर विश्वास करत आत्मनिर्भर भारत पुढे वाटचाल करत आहे. या उद्दिष्टपुर्तीसाठी आमचे मॅन्युफॅक्चरिंगवर विशेष लक्ष आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत.

(Advertise)

तसेच, देशातील उद्योजकांना उद्देशून मोदींनी म्हटले की, मागील १०० वर्षांपासून आपम सर्वजण देशाच्या अर्थव्यवस्थेला, कोट्यावधी भारतीयांचे जीवन सुकर बनण्यासाठी कार्यरत आहात. आता ती वेळ आली, आपल्याला नियोजनही करायचे आहे व त्यावर अंमलबजावणी देखील करायची आहे.

Post a Comment

0 Comments