बार्शी रस्ते आंदोलन ची जिल्हाधिकारी यांनी विधानसभा प्रश्नावली प्रमाणे तात्काळ माहिती द्यावी - मनीष देशपांडे


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी नगरपरिषद च्या समोर गेली अनेक दिवसापासून बार्शी तिल खराब रस्ते, अपूर्ण भुयारी गटार व शहरातील विबिध अपूर्ण कामे कामे यामुळे वाढलेली धूळ या बाबत राष्ट्रीय आंदोलन समन्वयक मनीष देशपांडे हे बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले आहेत त्यांच्या या आंदोलनाची दखल स्थानिक प्रशासनाने वेळीच न घेतल्याने व त्यांना पुरेशी माहिती दिली नाही तसेच त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत नाहीत यामुळे आंदोलक देशपांडे यांनी लोकायुक्त यांच्याकडे धाव घेतली होती. 

(Advertise)

यावेळी महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत की, बार्शीतील अपूर्ण भुयारी  गटार , खराब रस्ते वाढलेले धूळ यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ स्वतः जातीने चौकशी करून त्याची माहिती तात्काळ सादर करावी तसेच  विधानसभा किंवा विधानपरिषद सभागृहांमध्ये विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची माहिती जशी तात्काळ दिली जाते.  त्या स्तरावर आता मनीष देशपांडे यांच्या आंदोलनाचा विषय , मागणी व बार्शीतील अपूर्ण भुयारी गटार रस्ते वाढलेले धुळ  बाबतच सद्यस्थितीचा अहवाल आणि विविध कामावरती केलेला खर्च याची माहिती तात्काळ सादर करावी असे आज आदेश निर्गमित केले आहेत.

मनिष रवींद्र देशपांडे.
जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय,बार्शी समन्वयक व मानवी हक्क आणि कायदा संरक्षणकर्ता,सोलापूर जिल्हासमन्वयक.

Post a Comment

0 Comments