नॅशनल क्रश रश्मीका मंदाना लवकरच बॉलीवूडमध्ये ; जाणून घ्या चित्रपटाचे नाव



सध्या एक साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री खुप जास्त चर्चेत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे रश्मीका मंदाना. रश्मीका सध्या नॅशनल क्रश ऑफ इंडिया म्हणून खुप प्रसिद्ध झाली आहे. तिच्या सौंदर्यावर करोडो लोकं घायाळ झाली आहे. भारतासोबतच भारता बाहेरही रश्मीकाचे अनेक चाहते आहेत. तिने आजपर्यंत तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तरीही सगळ्या भारतामध्ये रश्मीका प्रसिद्ध आहे. 

 रश्मीका लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तुम्हाला धक्का बसेल पण ही गोष्ट खरी आहे. साउथ स्टार रश्मीका मंदाना बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिने तिच्या हिंदी चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. रश्मीका अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू बागची करणार आहेत. या जासूसी चित्रपटामध्ये सिध्दार्थ मल्होत्रा एक रॉ एजेंटची भुमिका साकारणार आहे.

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. याबद्दल रश्मीका सांगते की, ‘मला सगळीकडू प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे. या चित्रपटाची कथा माझ्यासाठी खुप महत्वाची आहे. याबद्दल मी निर्मात्यांची आभारी आहे. मी हा नवीन प्रवास सुरु करण्यासाठी आणि नवीन प्रेक्षकांना भेटण्यासाठी खुप उत्साही आहे’.

रश्मीकाने २०१६ मध्ये अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. आत्तापर्यंत तिने दहा चित्रपटांमध्ये काम केले आहे. या कमी वेळातच रश्मीकाची साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. खुपच कमी वेळात रश्मीकाला हे यश मिळाले आहे. रश्मीकाने विजय देवरकोंडासोबत गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खुप जास्त पसंत केले आहे. आज रश्मीका साऊथ टॉप आणि सर्वात महागडी अभिनेत्री आहे.

Post a Comment

0 Comments