पानगाव/प्रतिनिधी:
राज्य निवडणूक आयोगाने पानगांव ता . बार्शी या ग्रामपंचायतीची आरक्षण योग्य रितीने व नियमानुसार झाले नसून ते सदोष असलेने आतापर्यंत राबविण्यात आलेले प्रभागरचना व आरक्षण , मतदार यादी व निवडणूकीची सूचना हे सर्व टप्पे रद्द करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर .
[ग्रामपंचायत निवडणूक शाखा ] यांचे आदेश .
सदर ग्रामपंचायतीसाठी नव्याने प्रभागरचना करण्या करीता स्वतंत्रपणे कार्यक्रम देण्यात येईल असे कळविले आहे. पानगाव ता. बार्शी या ग्रामपंचायतीच्या निवडणूक विषयक सर्व टप्पे रद्द करण्यात आले . सदर ग्रामपंचायतीचा चालू निवडणूक कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हंटले आहे.
0 Comments