मुंबईमध्ये नगरसेवक आणि युवासेना कार्यकारणी सदस्य समाधान सरवणकर यांनी रक्तदान शिबीराचं आयोजन केलं होतं. रक्तदान केल्यास रक्तदात्यास एक किलो चिकन किंवा पनीर देण्यात येणार असल्याचं म्हटलं. यावरुनच भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.
या टिकेला जोरदार प्रत्युत्तर शिबिराचे आयोजक समाधान सरवणकर यांनी दिले. पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाच महत्व काय समजणार?, त्यांची अक्कल तोकडी आहे, असा टोला समाधान सरवणकर यांनी राम कदम यांना लगावला आहे.
0 Comments