✍️ सचिन दीपक लोंढे पाटील
जाता जाता अखेर सापडला....रोजचंच तुझं उगवण -मावळण पाहिलं आहे..पण यावर्षीच तुझं रूप जितक हवं तितक आशादायक नव्हतं..रोजचा दिवस नव्या संकटांना घेऊन उजडायचा आणि उद्या काहीतरी चांगलं घडेल या आशेवर मावळायचा... कधी आयुष्यात या वर्षी आले तितके वाईट अनुभव कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत...जग एका वेगळ्याच संकटातून जात असताना संपूर्ण मानवजातीला निसर्गाचं महत्व पटलं हेच यावर्षीच सर्वात मोठं यश म्हणावं लागेल...स्पर्धा कुणाशीही करावी पण निसर्गाशी नाही हे सुद्धा मानवाच्या लक्षात आलंच की...एका छोट्याश्या विषाणूने एका करोडो पेशींपासून बनलेल्या बुद्धिमान माणसाला गुडघे टेकायला लावले यातच मानवाची निसर्गातील खरी पातळी समजली...
बाकी माझ्या आयुष्यात सुद्धा हे वर्ष असच चढ-उतारांचं ठरलं. सगळीकडेच दुःखाच सावट असताना काहीतरी चांगलं सुद्धा घडलं. ज्या व्यक्तींची साथ काही वर्षांपूर्वी सुटली होती ती गाठ पुन्हा जोडली गेली. काही नव्याने ओळखी झाल्या. पदरात पैसे पडले नसले तरी पैशाहुन जास्त मौल्यवान लोक आयुष्यात जोडली गेली..त्याच महत्व शब्दात आणि पैशात मांडता येणार नाही...
असो....आयुष्य हे असंच समुद्राच्या लाटांसारखं कमी जास्त होत राहत...सुख-दुःख आणि चांगलं- वाईट या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडत राहतात...सरणार वर्ष, झालेल्या चुका, चुकलेली माणसं, दुरावलेले आप्त, आणि दुरावूनही पुन्हा परतलेले प्रिय या सर्वांच्या सोबतीने येणार वर्ष नव्या उमेदीने, नव्या आशेने सुरू होवो,हीच ईश्वराकडे प्रार्थना...!!!
0 Comments