राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पावर दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच त्यांच्याकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.
तर दुसरीकडे राऊत यांच्या मागणीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवली आहे.
‘शरद पवार यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. मात्र, इतिहास पाहिल्यास काँग्रेसने अन्याय केला आहे. मनमोहनसिंग यांच्याऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करायला पाहिजे होते; पण तसे घडले नाही. यामुळे काँग्रेस त्यांना यूपीएचे अध्यक्षपद देईल, असे वाटत नाही.’
0 Comments