सोलापुरात कांद्याचे दर घसरले, बाजापेठांमध्ये तुर्की आणि इजिप्तचा कांदा दाखल


 सोलापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिवाळीनंतर राज्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून दररोज कांद्याच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे. 

(Advertise)

एकीकडे स्थानिक कांद्याच्या दरात घसरण होत आहे तर दुसरीकडे सांगली आणि सोलापूरच्या बाजारात तुर्की आणि इजिप्तचा कांदा देखील दाखल झाला आहे.सोलापुरात मागील महिन्याभरात जवळपास तीन हजारांनी कांद्याचे दर घसरले आहेत. 

(Advertise)

आज सोलापुरात चांगल्या दर्जाच्या कांद्याला जास्तीत जास्त २६०० रुपये प्रति क्विंटल भाव होता. तर तिकडे सांगलीच्या बाजारपेठात देखील सरासरी ३० ते ३५ रुपये प्रति किलो भावाने कांदा विक्रीला गेला. सातत्याने कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments