राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; कल्याण काळे ‘घड्याळ’ बांधणार?


भाजपा नेते कल्याण काळे यांनी शरद पवार यांच्या गाडीतून सरकोली ते पंढरपूर असा प्रवास केला. भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीच्या वाटेवर जाण्याचे संकेत दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. कल्याणराव, सगळ्यांना एकत्र करुन निर्णय घेऊ, असे म्हणत शरद पवारांनीही कल्याणरावांच्या पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

(Advertise)

 कल्याणराव काळे हे शरद पवारांच्या गाडीतून सरकोलीतील दिवंगत आमदार भारत भालके यांच्या घरी दाखल झाले. तसेच शरद पवार यांनी आपल्या भाषणात कल्याण काळे यांचा आवर्जुन उल्लेख केला.

(Advertise)

तसेच यापुढे शरद पवार सांगतील त्या पद्धतीनं आपण काम करू, असेही  कल्याणराव काळे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजप नेते कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठे नाव आहे. 

Post a Comment

0 Comments