३१ डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा करणार सुपरस्टार रजनीकांत


 आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा थलैवा अर्थात सुपरस्टार रजनीकांत यांनी केली आहे. रजनीकांत यांनी गुरूवारी ट्विट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. 

(Advertise)

 त्याचबरोबर जानेवारी महिन्यापासून त्यांचा राजकीय पक्ष कार्यरत होईल, असेही यावेळी सांगण्यात आलं.

(Advertise)

 गेल्या दोन वर्षांपासून रजनीकांत राजकारणात सक्रीय आहेत. पण त्यांनी राजकारणात अधिकृतपणे प्रवेश केलेला नाही. अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी गतवर्षी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. 

Post a Comment

0 Comments