पेईंग गेस्ट महिलेने केला १५ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ

 
मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी एका २४ वर्षीय महिलेला अटक केली आहे. एका १५ वर्षीय मुलाचा केल्याचा आरोप तिच्यावर आहे. गोरेगावमधील या पीडित मुलाच्या घरी आरोपी महिला पेईंग गेस्ट म्हणून राहत होती.

 मुलाच्या आईने यासंबंधी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार, महिलेने तिच्या अल्पवयीन मुलाशी मैत्री केली आणि अनेकदा त्याच्याशी लैंगिक चाळे केले. आरोपी महिलेच्या वकिलाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. फ्लॅटच्या भाड्याच्या पैशांवरून झालेल्या वादातून हे आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुलाचे आणि महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या आईला मित्राकडून समजले. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. 

 पेईंग गेस्ट म्हणून मुलाच्या घरी राहायची आरोपी महिला ही एका शॉपिंग सेंटरमध्ये नोकरीला आहे. तिला एक मुलगा देखील आहे. सप्टेंबरपासून ही महिला पीडित मुलाच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला तिने त्यांची खोली सोडली होती. या कालावधीत तिने अल्पवयीन मुलाचे शोषण केले, असा आरोप करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments