करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यात दशहत निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर अकलुजचे डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिवाची पर्वा न करता १५ फुटांच्या अंतरावरून तीन गोळ्या झाडल्या आणी बिबट्याला ठार केले आणी वनविभागाला जे जमले नाही ते करून दाखवले. त्यामुळे वनविभागाला बिबट्याला मारण्यास यश आले. यामुळे करमाळा तालुका पत्रकार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार केला आहे.
करमाळा तालुक्यातील तीघाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला वनविभाग व पोलिस प्रशासक रात्रीचा दिवस करत होते त्यामुळे नागरिकांना आधार मिळाला होता. पुढील घात होऊ नये म्हणून वेळोवेळी पोलिस प्रशासन व वनविभाग सुचना देत होते. आणी वेळप्रसंगी उपाशी पोटी सुद्धा जनतेच्या संरक्षणासाठी पळत होते.बिबट्या चलाक असल्याने चकवा देत होता.
त्यामुळे त्यांना बिबट्याला पकडण्यासाठी व मारण्यासाठी अपयश येत होते शेवटी अनेक प्रयत्नाने खाजगी शार्प शुटर डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांना परवानगी दिली आणी वनविभागाला बिबट्या मारण्यास यश आले.
0 Comments