पवार साहेबांनी पुढाकर घेतला तर...' मेट्रो कारशेडवर शिंदेंचे सुचक वक्तव्य कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडचा निर्णय लोकांच्या हिताचा प्रकल्प


 
मुंबई - मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. तर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे या वादावर तोडगा काढण्याची मागणी केलीये.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, 'कांजूर मार्गची जागा राज्य सरकारची आहे, हे कागदोपत्री सिद्ध झाले आहे. हा कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडचा निर्णय लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे. यात १ कोटीहून जास्त लोकांना फायदा झाला असता. केंद्र सरकारनेही सहाकार्य करायला हवे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अधिक बोलता येणार नाही' असे एकनाथ शिंदे म्हणाले.

'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमीच महाविकास आघाडीला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे या ही प्रकरणात ते लक्ष घालतील. शरद पवार ज्या ज्या वेळी असे प्रसंग येतात तेव्हा मार्गदर्शन करतात. पवार साहेबांनी पुढाकर घेतला तर यातून नक्कीच मार्ग निघू शकेन' असेही शिंदे म्हणाले.

'कांजूरमार्ग येथील जागेवरून वाद सुरू आहे. न्यायालयाने फक्त कामाला स्थगिती दिली आहे. परंतु आणखी काही जागांचे पर्याय तपासले जातायेत. जो पर्याय चांगला असेल तो निवडला जाईल. बीकेसीमधील जागेची पाहणी सुरू आहे', असेही शिंदे म्हणाले.


Post a Comment

0 Comments