करमाळा येथील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचा मुख्य वनरक्षक अधिकार्‍यांचा आदेश


करमाळा/प्रतिनिधी:

अहमदनगर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आठ दिवसापासून दोन बळी घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश राज्याचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी नितीन काकोडकर यांनी संबंधित वन विभागाला दिले आहे.

(Advertise)

गोदावरी खोऱ्यातून आलेल्या नरभक्षक बिबट्याने अहमदनगर बीड सोलापूर जिल्ह्यात आठ जणांचा बळी घेतला आहे त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यात बिबट्याचा वावर तूर ऊस गहू या पिकांमध्ये असल्यामुळे वनविभागाला नरभक्षक बिबट्याला जर बंद करण्यास अडचण निर्माण होत आहे नरभक्षक बिबट्या तीन ते चार दिवसाआड मानवाला आपले भक्षक बनवत आहे त्यामुळे हा नरभक्षक बिबट्या मानव समाजासाठी घातक बनत चालला आहे त्यामुळे त्याला जेरबंद करणे आवश्यक झाले आहे.

(Advertise)

बिबट्याला ठार मारण्यासाठी हे उपाय योजना

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत दोन जणांचा बळी घेतला आहे तालुक्यातील उजनी काट भागातील या बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे या भागातील बिबट्या वावरत असताना त्याच्या पायाचे ठसे वनविभागाला दिसून आले आहेत मुख्य वनसंरक्षक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या नरभक्षक बिबट्याला ठार मारणे पूर्वी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करावे किंवा बेशुद्ध करून त्याला बंदी बंदिस्त करण्यास प्राधान्य द्यावी असे न झाल्यास मानवजातीला धोका निर्माण झाल्यामुळे या बिबट्याला ठार मारण्याच्या आदेश देण्यात आले आहे बिबट्याला ठार केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे इनाम स्वीकारले जाणार नसल्याची माहिती वन विभाग अधिकारी यांनी दिली आहे

करमाळा तालुक्‍यात रायगाव जवळील फुंदे वस्तीवरील तरुण शेतकरी कल्याण फुंदे व दुसऱ्या दिवशी अंजनडोह येथील जयश्री शिंदे ही विवाहिता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. त्यामुळे संपूर्ण करमाळा तालुक्‍यात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.  सर्वजण दहशतीखाली वावरू लागले आहेत. वन विभागाकडून शेतकरी, ग्रामस्थ यांना बिबट्यापासून कोणताही धोका होऊ नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी १५ लाखांची मदत

(Advertise)

नरभक्षक बिबट्या बीड- नगरमार्गे करमाळ्यात आला आहे. आता तो दक्षिणेकडे सात ते दहा किलोमीटरपर्यंत जावू शकतो, असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून वन विभाग व पोलिस प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने स्वतंत्र पथकांची नियुक्‍ती केली आहेत. परिसरात कॅमेरे, सीसीटिव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. वनविभागाकडून मृत नातेवाईकांना प्रत्येकी पंधरा लाखाची मदत मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments