धक्कादायक! पेनमध्ये ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या


पेनमध्ये ३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. पेणच्या ग्रामीण रुग्णालयात तिचा मृतदेह विच्छेदनासाठी आणण्यात आला. प्राथमिक चौकशीत तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
_________________________________________

श्री हालमत सांप्रदाय मंडळाची २०२१ ची दिनदर्शिका माफक दरात उपलब्ध.....
किंमत फक्त ३० रुपये
संपर्क : ७३८७७१२५२५/९७३००३२७२४
(Advertise)
_________________________________________


मिळालेल्या माहितीनुसार, पॅरोलवर अलिबाग तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीने ३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केल्याचं कळतंय. आरोपी हा गागोदे येथील राहणार असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. याआधीही बलात्काराच्या आरोपाखाली तो तुरुंगात गेला होता. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments