बलात्काराचा गुन्हा दाखल!....तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख सर्व आरोप फेटाळाले


 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. खाजगी शिकवणी घेणार्‍या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त समोर आल्यानंतर मेहबूब शेख यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत तरूणीने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

महिलांच्याप्रती मला प्रचंड आदर आहे. तसेच माझा याप्रकरणाशी कुठलाही संबंध असला तर मी फासावर जायला तयार आहे. मी राजकीय आणि सामाजिक जीवनातून संन्यास घ्यायला तयार आहे, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments