सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हैद्राबाद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नयनतारा आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैद्राबादमध्ये होते. त्यांनी शूटिंगला सुरुवात देखील झाली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील ८ जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं.
२२ डिसेंबर रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर ते विलगीकरणात होते. मात्र, रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना चेन्नई ला सुद्धा जाता आले नाही. त्यामुळे, हैद्राबादेत रामोजी फिल्म सिटी येथे सुरु असणारे शूटिंग थांबविण्यात आले आहे. या चित्रपटाचे शेड्युल ४५ दिवसांचे होते. मात्र, आता चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे दिसत आहे.
दवाखान्यातून रजनीकांत यांना रक्तदाबाच्या त्रासामुळे दवाखान्यात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाला कि, त्यांना दवाखान्यातून सोडण्यात येईल. मात्र, त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे असेही सांगण्यात आले आहे.
0 Comments