आजची रात्र जगातली सर्वात मोठी रात्र असते



२२ डिसेंबर ह्या दिवशी जगातली सर्वात मोठी रात्र असते. तर आजचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीही गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत.

(Advertise)

 हिंदू संस्कृतीमध्ये ह्या आजच्या दिवसाचे फार महत्व आहे. आजपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. आजच्या दिवशी महाभारतातील भीष्मपितामह त्यांनी आपला शरपंजर देह सोडला. त्यांना इच्छा मरण प्राप्त होते. या दिवशी सर्व पित्र उत्तर दिशेला स्थलांतर करतात म्हणूनच या दिवसाला 'पित्रायण' असे देखील म्हणतात.

(Advertise)

आज शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी उत्तररात्री ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे उत्तरायणारंभ होत असून शिशिर ऋतूचा प्रारंभ होत आहे. दिनमान सर्वात लहान १० तास ५७ मिनिटांचे असून रात्र सर्वात मोठी म्हणजे १३ तास ३ मिनिटांची असणार आहे. तसेच उद्या शनिवारपासून दिनमान वाढत जाणार आहे.

Post a Comment

0 Comments